Search
Close this search box.

धनकवडीत हॉटेलला भीषण आग : २४ वर्षीय कामगाराचा मृत्यू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे, ३० मार्च: धनकवडी परिसरातील के के मार्केटजवळील साईबा हॉटेलमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या आगीच्या दुर्घटनेत २४ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. संतोष (वय २४) असे मृत कामगाराचे नाव आहे.

आगीची माहिती मिळताच कात्रज आणि गंगाधाम अग्निशमन केंद्राचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी हॉटेलमध्ये अडकलेल्या संतोषला बाहेर काढण्यास प्राधान्य दिले. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दोन दुकाने आणि हॉटेलचे नुकसान

शेजारील दोन दुकानांना आगीचा फटका बसला असला तरी वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठे नुकसान टळले. हॉटेलमधील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. दूध तापवताना सिलेंडरमधून वायूगळती झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हॉटेलमधील आठ सिलेंडरपैकी तीन सिलेंडरमधून मोठ्या प्रमाणात गॅसगळती झाल्याचे आढळले.

अग्निशमन दलाने वेळीच घेतले नियंत्रण

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्टेशन ऑफिसर सुनील नाईकनवरे, रामदास शिंदे, भरत वाडकर, बांदीवडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न केले. हॉटेलमधील गॅसगळतीचा धोका मोठा असल्याने तत्काळ कारवाई करत आग आटोक्यात आणण्यात यश आले.

ही दुर्घटना गुढीपाडव्याच्या आनंदावर पाणी फेरणारी ठरली असून, संपूर्ण धनकवडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें