पुणे प्रतिनिधी – जोतिबा सावंत
अधिक माहिती अशी की, बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ८४/२०२५ भा.न्या. संहिता कलम १०९(२), ३५१(२), ३५२, ३(५) भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) महा. पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ मधील फिर्यादी ओमकार शाहूराज जाधव, वय २५ वर्षे, रा. सर्वे नं. ६२४/१/१ बी प्रतिभा निवास बिबवेवाडी पुणे यांनी आरोपी नामे देवेन संजय पवार, वय २६ वर्षे, रा. निलसागर सोसायटी गॅस गोडावून जवळ, बिबवेवाडी पुणे यांना फोनवरून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून चिडून जाऊन त्याचा राग मनात धरून फिर्यादी हे दि. १७/०४/२०२५ रोजी पहाटे ००:३० वाजता महेश सोसायटी, श्रवण हेअर कटींग सलोन बिबवेवाडी समोरून जात असताना आरोपी देवेन पवार याने धारदार शस्त्राने डोक्यास व डाव्या हाताच्या मनगटावर करून फिर्यादी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हा दाखल गुन्हयातील आरोपी नामे देवेन संजय पवार, वय २६ वर्षे, हा पळून गेला होता. मा. शंकर साळुंखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व मा. सुरज बेंद्रे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस ठाणे कडील तपास पथकातील स्टाफ आरोपीचा कसून शोध घेत होते. दि. २०/०४/२०२५ रोजी तपास पथकातील अंमलदार सुमित ताकपेरे यांचे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नामे देवेन संजय पवार, वय २६ वर्षे यास तपास पथकातील अंमलदार यांनी ताब्यात घेवून त्यास अटक करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस हवालदार शाम लोहोमकर, संतोष जाधव, संजय गायकवाड, पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे, दत्ता शेंद्रे, विशाल जाधव, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, प्रणय पाटील, रक्षित काळे यांनी केली आहे.
