पुणे प्रतिनिधी आंबेगाव
पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये आंबेगाव पोलीस स्टेशन या नवीन पोलीस स्टेशनची दिनांक ११/१०/२०२४ रोजी निर्मीती करण्यात आली असुन तेव्हापासुन आंबेगाव पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज छोट्याशा जागेत काम सुरु झाले होते. आंबेगाव पोलीस स्टेशनचे उद्घाटन होते वेळी पोलीस स्टेशनचे कामकाजाकरीता केवळ दोन रुम उपलब्ध होत्या व त्या दोन रुम मधूनच आंबेगाव पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज सुरु होते.
पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इतारतीचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने यांचे मार्गदर्शनाखाली बांधकाम नुकतेच पूर्ण करण्यात आले असून, या स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आज शुक्रवार दिनांक 23/05/25 रोजी मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते फित कापुन व कोनशीला अनावरण करुन करण्यात आले.
याप्रसंगी मा.सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर श्री.राजेश बनसोडे, मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२ स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रियांका गोरे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वंजारी, स्वाती देवधर, भोजलींग दोडमीसे, मोहन कळमकर, रतिकांत कोळी, युवराज शिंदे, मारुती वाघमारे, नितीराज थोरात, सुरेश शिंदे तसेच आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस अंमलदार तसेच परिसरातील नागरिक तसेच मान्यवर उपस्थित होते.