Search
Close this search box.

शिवसेनेच्या राजगड (वेल्हा) तालुकाप्रमुखपदी अंकुशराव चोरघे यांची नियुक्ती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वेल्हा, ५ जून – पुणे प्रतिनिधी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा कट्टर निष्ठावान अनुयायी, वांगणी वाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच व श्री मळाई देवी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री. अंकुशराव चोरघे यांची राजगड (वेल्हा) तालुका शिवसेना प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाने एक निष्ठावान, कार्यक्षम व लोकमान्य कार्यकर्त्याला ही जबाबदारी सोपवली असून, संपूर्ण वेल्हा तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. या निवडीमुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, संघटन बळकट होण्यास चालना मिळणार आहे.

या नियुक्तीवर माजी तालुकाप्रमुख व वेल्हा ग्रामपंचायतीचे उपसरपंच दत्ताभाऊ देशमाने यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “दाजींची (चोरघे) कार्यक्षमता, लोकांशी थेट संपर्क आणि पक्षनिष्ठा लक्षात घेता ही निवड अत्यंत योग्य असून, त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात शिवसेना अधिक बळकट होईल.”

श्री. अंकुशराव चोरघे यांचे विविध स्तरांवरील सामाजिक योगदान आणि संघटन कौशल्य लक्षात घेता त्यांची ही नियुक्ती सर्व शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

– शुभेच्छुक: तमाम शिवसैनिक, राजगड (वेल्हा) तालुका
बाळासाहेब चांदेरे – जिल्हाप्रमुख, शिवसेना, पुणे
दत्ताभाऊ देशमाने – माजी तालुकाप्रमुख व मा. उपसरपंच, वेल्हा

Leave a Comment

और पढ़ें