पुणे (प्रतिनिधी) | संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी १५१ पेक्षा अधिक ठिकाणी विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी यांच्या संस्कार वर्ग स्थापन पूजांचा भव्य सोहळा पार पडला. या उपक्रमांतर्गत कात्रज, पुणे येथे देखील उत्साहपूर्ण वातावरणात संस्कार वर्ग सुरू करण्यात आला. लहानग्यांच्या मनामध्ये भारतीय संस्कृतीची बीजे रोवून चारित्र्य निर्माण करण्याचा आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा देण्याचा उद्देश या वर्गामागे आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. अनिल रेळेकर (अध्यक्ष — पुणे पोलीस मित्र, अध्यक्ष — एस. पी. इंटरनॅशनल स्कूल व अमर एज्युकेशन सोसायटी आंबेगाव पठार, संचालक — इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ) यांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये कात्रज संस्कार वर्गाचे कार्यकर्ते शरद माने, शैलजा खळदकर, ज्योती जगताप, आरती वैद्य, अतुल थोरवे, दीक्षा मवाल, इशिता पटेल, भावना राठोड, अनुष्का इंगळे, श्रुतिका बिडकर, वृषाली जगताप, कडू दादा, पासलकर दादा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयंत पाटणकर, उपाध्यक्ष मा. श्री. देवदास गरुड, मा. श्री. मारुती पाटील (खजिनदार), प्रदीप मलशेट्टे, मा. श्री. किशोर पवार, सूर्य यांनी देखील विशेष उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी बोलताना मा. अनिल रेळेकर म्हणाले, “स्वामी विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून आयोजित होणारे हे संस्कार वर्ग समाजातील लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणारे, त्यांना संघटित करणारे आणि देशभक्तिपर कार्यकर्ते घडवणारे आहेत.
मुलांनी मोबाईल पासून दूर राहून अशा संस्कार वर्ग शिबिरातून स्वत:ला घडवले पाहिजे, कारण ह्याच पिढीवर पुढील भारताचे भविष्य अवलंबून आहे.” कार्यक्रमादरम्यान अतुल थोरवे यांनी मुलांबरोबर उपस्थित पाहुण्यांनाही खेळाच्या उपक्रमांमध्ये सामील करून कार्यक्रमात रंगत आणि उत्साह आणला. या कार्यक्रमास लहान मुलं, मुली, तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते, आणि त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.