Search
Close this search box.

बिबवेवाडी पोलीसांनी मोक्यातील गुंगारा देवून फरार असणाऱ्या आरोपीस केले जेरबंद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी (जोतिबा सावंत)

दिनांक ०८/११/२०२३ रोजी १२.३० वा. चे सुमारास फिर्यादी यांचा मुलगा प्रेम ऊर्फ यश कदम हा बाहेरून जेवण करून घरी येत असताना त्याचे ओळखीचे सौरभ शिंदे, तेजस जगताप, चंदर राठोड, अनिकेत काटकर व पंकज दिवेकर रा. अप्पर बिबवेवाडी पुणे यांनी त्याला धरून कुसाळकर किराणा मालाचे दुकानाचे गल्लीतून आतील मंदिराचे मोकळ्या मैदानात अप्पर बिबवेवाडी येथे घेवून जावून त्याचेवर लोखंडी रॉड व लोखंडी हत्याराने जुन्या भांडणारचे कारणावरून दोन्ही हाताचे मनगटावर, दोन्ही पायाचे गुडघ्याचर व नडग्यांवर, पोटावर व डोक्यात यार करून गंभीर जखमी करून त्यास जिये तार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून विबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २३९/२०२३, भा.दं. वि. कलम. ३०७, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) सह १३५ गुन्हा दाखल असून दाखल गुन्हा नमुद आरोपीनी संघटीतपणे केलेला असल्याने दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१) (ii), ३(२), ३(४) प्रमाणे कलमवाढ करण्यात आली आहे. दाखल गुन्हयामध्ये एकूण तेजस जगताप, अनिकेत काटकर, सौरभ शिंदे व पंकज दिवेकर यांना अटक करण्यात आलेली आहे.

गुन्हा दाखल झालेपासून गुन्हयातील पाहीजे असणारा अत्यंत शातीर, पोलीसांचे डावपेच ओळखून असणारा आरोपी चंदर हुन्नाप्पा राठोड, वय-२२ वर्षे, रा. चैत्रबन वसाहत, महालक्ष्मी स्टोअर जवळ, अप्पर बिबवेवाडी पुणे हा पोलीसांना मिळून येत नसल्याने सहा. पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग, पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सुरज बेंद्रे बिबवेवाडी पोलीस ठाणे पुणे यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनाप्रमाणे तपास पथकातील अंमलदार सदर आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे व आशिष गायकवाड यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत सदरचा आरोपी सासवड पुणे येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता लागलीच मा. वरिष्ठांच्या परवानगीने व सूचनांप्रमाणे सासवड येथे जवून त्याचा शोध घेत असताना तो सासवड जेजूरी रोड भारत पेट्रोलपंप येथे उभा असलेला दिसल्याने त्यास ताब्यात घेणेकामी वरील पोलीस स्टाफ जात असताना त्यास पोलीस आल्याची चाहूल लागल्याने तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून थोड्या अंतरावरच त्यास पकडून वरिष्ठांच्या समोर हजर करून त्यास दाखल गुन्ह्यात अटक करून त्याची येरवडा कारागृह येथे रवानगी केली आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त धन्यकुमार मोडसे वानवडी विभाग पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सूरज बेंद्रे, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे, आशिष गायकवाड, प्रणय पाटील, शिवाजी येवले, रक्षित काळे, विशाल जाधच, ज्योतिष काळे, व दत्ता शेंडे यांनी केली आहे.

(अश्विनी सातपुते) वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर

Leave a Comment

और पढ़ें