पुणे प्रतिनिधी दिनांक २६/०६/२०२५ रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमधील हद्दीत २६ जुन जागतीक अंमलीपदार्थ विरोधी दिनानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रथम बिबवेवाडी पोलीस स्टेशन स्टेशनकडील सर्व अधिकारी व अंमलदारांनी नशामुक्तीची शपथ घेतली. त्यानंतर नशामुक्ती जनजागृती अभियानाअंतर्गत, पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी यांनी हद्दीतील विश्वकर्मा विद्यालय, सुप्पर बिबवेवाडी पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्यांना, २६ जुन जागतीक अंमलीपदार्थ विरोधी दिनाचे अनुषंगाने विद्यार्थ्यांना अमली पदार्थ म्हणजे काय, अंमली पदार्थांचे आरोग्यावर होणारे परिणाम, व्यसनमुक्तीसाठी शासकीय व स्वयंसेवी संस्था, मुलांनी आणि पालकांनी घ्यावयाची काळजी व्यसनाची सुरुवात कशा प्रकारे होती, मित्र, वाईट सवयी, तणाव अंमली पदार्थ व्यसनामुळे वाढती गुन्हेगारी. त्यावरील होणारी कायदेशीर कार्यवाही याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे व विद्यालयातील प्राचार्य श्रीमती देशपांडे यांनी सविस्तर माहिती दिली व शपथ देण्यात आली तद्नंतर शाळेतील ३०० विद्यार्थी, शाळेचे प्राचार्य, शिक्षकवर्ग यांचेसह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी नशामुक्ती जागृतीकरीता हातात बॅनर आणि फलक घेवुन पोलीस व्हॅनसह रॅली काढण्यात आली.
त्याचप्रमाणे न्यु एंजल स्कुल, सरसेनापती हैबतराव शिळीमकर शाळा बिबवेवाडी गावठाण, श्रीराम राज्य शाळा, पै. हिरामण बनकर माध्यमिक विद्यालय, बिबवेवाडी पुणे अशा वेगवेगळ्या शाळेत जाउन सविस्तर मार्गदर्शन करुन, अंमली पदार्थाचे व्यसनमुक्ती पर शपथ वाचन घेण्यात आले सदर कार्यक्रमात बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे श्रीमती अश्विनी सातपुते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सुरज बेंद्रे, पोलीस निरीक्षक व सर्व अधिकारी व अंमलदार यांनी नशामुक्ती जनजागृती कार्यक्रमात उत्स्फुर्त सहभाग घेतला.