Search
Close this search box.

शरद मोहोळ टोळीतील सक्रिय सदस्य बिबवेवाडी पोलीसांच्या जाळ्यात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी

  • सदरबाबत अधिक माहिती अशी की, चंदन नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ०३/२०२५ भारताचा हत्याराचा कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५. भारतीय न्याय संहिता कलम १११, ६१ (ब) अन्वये दाखल असून दि. ०२/०१/२०२५ रोजी दुपारी १४/०० वा. चे सुमारास कोठारी इंटरनॅशनल स्कुलकडे जाणारे रोडवर खराडी पुणे येथे आरोपी १) संदेश लहू कडू, वय २१ वर्षे, रा. काळुबाई कॉलणी अथर्व विद्यालय शेजारी कोथरूड पुणे २) शरद शिवाजी मालपोटे, वय २९ वर्षे, रा. सुतारदरा, पांडुरंग कॉलनी कोथरूड पुणे हे त्यांचेजवळ दोन लोखंडी पिस्टल मॅगझीनसह व ०७ जिवंत काडतूस बेकायदेशिर रित्या विनापरवाना जवळ बाळगताना मिळून आल्याने त्यांचेविरुध्द वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करणेत आली होती. त्यांचेकडे तपासादरम्यान त्यांचेसोबत आरोपी रामदास गोविंद वांजळे, वय ४४ वर्षे, रा. नविन अहिरे गाय, दशरथ आनंद बिल्डींग (जिल्हा परिषद मराठी शाळा जवळ) पुणे हा दाखल गुन्ह्यात सहभागी असलेबाबत निष्पन्न झाले. सदर आरीपीचा गुन्हे शाखेकडील पथके त्याचा कसून शोध घेत होती. परंतु सदर आरोपी सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने तो आपली ओळख लपवून वावरत होता.

 

दि. ०१/०७/२०२५ रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे यांना त्याचे गुप्त बातमिदारामार्फत मिळालेल्या बातमिनुसार बातमिची खात्री करत असताना, जयपुर गार्डन हॉटेलजवळ थांबलेला अंगात पिवळ्या रंगाचा टिशर्ट घातलेला, कपाळावर गंध लावलेला एक इसम आम्हास पाहून पळू लागल्याने आमचा संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव-पत्ता रामदास गोविंद वांजळे, वय ४४ वर्षे, रा. नविन अहिरे गाव, दशरथ आनंद बिल्डींग (जिल्हा परिषद मराठी शाळा जवळ) पुणे असे असल्याचे सांगितलेने तो चंदन नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ०३/२०२५ भारताचा हत्याराचा कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५. भारतीय न्याय संहिता कलम १११, ६१ (ब) मधील पाहीजे आरोपी असल्याचे निष्पन्न झालेने त्यास मा. वरिष्ठांचे आदेशाने खंडणी विरोधी पथक क्र. १ पुणे शहर यांचे ताब्यात पुढील तपासकामी देणेत आले आहे.

 

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरण बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक बाळू चोपडे, तपास पथककातील पोलीस हवालदार संजय गायककवाड, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, रक्षित काळे, विशाल जाधव, अभिषेक धुमाळ, संतोष बनसुडे, दत्ता शेंद्रे यांनी केली.

Leave a Comment

और पढ़ें